Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : पुणे हादरलं! लग्नाचे आमिष दाखवून २ तरुणींवर बलात्कार

Pune Crime News : पुण्यातून सलग तीन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लग्नाचं आमिष दाखवून दोन तरुणी आणि एका महिलेवर बलात्कार केल्याची प्रकरणं उघडकीस आली आहेत. कोंढवा, हडपसर आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

पुण्यात लग्नाचं आमिष दाखवून दोन तरुणींसह एका महिलेवर बलात्कार

कोंढवा, हडपसर आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल

आरोपींना अटक करून पोलीस तपास सुरू

सुशिक्षित शहरात वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांमध्ये संताप

पुण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून तीन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणी आणि एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा, सहकारनगर आणि हडपसर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोंढव्यात अनिकेत राकेश निकाळजे याने अल्पवयीन मुलीशी ओळख केली. त्यानंतर राकेशने अल्पवयीन मुलीला विश्वासात घेत तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. पीडित मुलीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने पीडितेला धमकावले. घाबरलेल्या युवतीने नुकतीच पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या घटनेप्रसंगी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अनिकेतला काही तासात बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यातील हडपसर भागात देखील लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवलं. शिवाय तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यानंतर तरुणी गर्भवती राहिली. तिने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्याने तिच्याशी बोलणं टाळलं. यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी अभिषेक सरक विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

दरम्यान, लग्नाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याची आणखी एक घटना पुण्यातील सहकारनगर मधून उघडकीस आली आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार रुपेश बाळू साळवे याला अटक करण्यात आली. आरोपी साळवेने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. पोलीस या घटनेचा तपास करत असून पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात या घटनांची संख्या वाढत आहे. ही बाबा लाजिरवाणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

Chinmayee Sumeet : "होय मी जयभीमवाली..."; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

Shivani Rangole Photos: शिवानीचं मराठमोळं सौंदर्य! जांंभळ्या साडीत दिसतेय खूपच भारी

Liver damage: लिव्हर खराब होण्यापूर्वी हातावर दिसतात संकेत; डॉक्टरांनी सांगितली ५ महत्त्वाची लक्षणं

SCROLL FOR NEXT