Pune Cafe News : पुण्यात कॅफेच्या नावावर चालत होता हुक्का पार्लर, पोलिसांचा मध्यरात्री छापा, ५ जण अटकेत

Pune Crime News : पुण्यातील बाणेर परिसरातील औंध-बाणेर लिंक रोडवरील शेतात चालणाऱ्या फार्म कॅफेमध्ये पोलिसांनी अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालक, व्यवस्थापक आणि तीन कामगारांना अटक करण्यात आली. पोलिसांनी जवळपास ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Pune Cafe News : पुण्यात कॅफेच्या नावावर चालत होता हुक्का पार्लर, पोलिसांचा मध्यरात्री छापा, ५ जण अटकेत
Pune Crime NewsSaam Tv
Published On
Summary

बाणेर परिसरातील शेतात फार्म कॅफेच्या नावाखाली चालत होतं अवैध हुक्का पार्लर

चतु:श्रृंगी पोलिसांनी पहाटे धाड टाकून ५ जणांना अटक केली

४८ हजार रुपयांचा हुक्क्याचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला

पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

पुण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात अवैद्यरित्या शेतात हुक्का पार्लर चालवला जात होता. बेकायदेशीरपणे हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये मालकासह व्यवस्थापक आणि कामगारांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बाणेर परिसरात औंध- बाणेर लिंक रस्त्यावर शेतामध्ये फार्म कॅफेमध्ये बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरु होते. या प्रकरणाची पोलिसांना सुगावा लागला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठा सापळा रचला आणि घटनास्थळी पोहचले.

Pune Cafe News : पुण्यात कॅफेच्या नावावर चालत होता हुक्का पार्लर, पोलिसांचा मध्यरात्री छापा, ५ जण अटकेत
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात गारठा वाढला, 'या' जिल्ह्यात कडाक्याची थंडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

पोलिसांनी ठरल्याप्रमाणे रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून या कॅफेवर छापा टाकत ५ जणांना बेड्या ठोकल्या. त्यामध्ये कॅफे मालकांसह व्यवस्थापक आणि कामगारांचा समावेश आहे. कॅफे मालक अमित वाळके, मॅनेजर बलभीम कोळी, कॅफे चालक विक्रम कुमार द्वारकाप्रसाद गुप्ता, हुक्का भरणारा वेटर सुरज संजय वर्मा, राजकुमार चन्नू अहिरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Cafe News : पुण्यात कॅफेच्या नावावर चालत होता हुक्का पार्लर, पोलिसांचा मध्यरात्री छापा, ५ जण अटकेत
Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर लिंक रोडवरील फार्म कॅफे येथे ग्राहकांना हुक्का पिण्यास दिला जात असल्याची माहिती चतु:श्रृंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार औंध – बाणेर लिंक रोडवर आतमध्ये शेतजमीनवर शेड टाकून हा फार्म कॅफे चालविला जात होता. पोलिसांनी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्यावर छापा टाकला. त्यावेळी ५ ते ६ ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पुरवला जात होता.

Pune Cafe News : पुण्यात कॅफेच्या नावावर चालत होता हुक्का पार्लर, पोलिसांचा मध्यरात्री छापा, ५ जण अटकेत
Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

शेडमध्ये विविध कंपनीचे तंबाखुजन्य हुक्क्याचे फ्लेवर ठेवले होते. पोलिसांनी येथून ४८ हजार ६५० रुपयांचे हुक्क्याचे फ्लेवर, २० काचेचे हुक्का पॉट व हुक्क्याचे साहित्य जप्त केले आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय येळे, उमेश कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com