Two School students ended her life journey in Karve and Neral area incident in Navi Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai: खळबळजनक! नवी मुंबईत २ शाळकरी मुलांनी संपवलं जीवन; पोलीस तपासातून समोर आलं चक्रावून टाकणारं कारण

Navi Mumbai News: नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिसिंग प्रकरणानंतर आता एकाच दिवशी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Satish Daud

Navi Mumbai Student News

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिसिंग प्रकरणानंतर आता एकाच दिवशी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अभ्यासातील तणावामुळे दोन्ही विद्यार्थ्यांनी हे टोकाचं पाऊस उचलल्याची माहिती आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वी ढवळे (वय १४ वर्ष) आणि दर्शील पाटील (वय १५ वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. शाळेतील अभ्यास कठीण जात असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शील पाटील हा अल्पवयीन विद्यार्थी करावे परिसरात राहत होता. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याने बहिणीच्या मोबाइलवर मॅसेज पाठवला. माझ्यावर अभ्यासाचा तणाव असून आपण कुटुंबियांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असा मॅसेज पाठवत त्याने तलावात उडी घेतली.

दुसरीकडे नेरूळ (Navi Mumbai) येथे राहणाऱ्या १४ वर्षाय पृथ्वी ढवळे याने देखील टोकाचं पाऊल उचललं. घरात कुणी नसल्याचं पाहून पृथ्वीने बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अभ्यासाच्या तणावातून एकाच दिवशी दोन मुलांनी जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतून अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातच आता या घटना घडल्याने आजूबाजूच्या परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे सेवा 15 मिनिट उशिराने

राज्यात मोठी उलथापालथ! नवीन ५ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; कोण आहेत नवे चेहरे?

मुंबईत प्रसिद्ध उद्योगपतीचा अपघात; रुग्णालयात तातडीने उपचार सुरू

CMOकडून राजीनाम्याचे निर्देश येताच रुपाली चाकणकरांची सोशल मीडियावर पोस्ट; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: अचानक पैसा येणार, ५ राशींचे अडथळे होणार दूर; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT