Accident, Virar Saam tv
मुंबई/पुणे

Virar : राई पाडा परिसरातील कार अपघातात दाेघांचा मृत्यू, दाेघे जखमी

या अपघातामधील जखमींवर उपचार सुरु आहेत.

चेतन इंगळे

विरारा : विरार (virar) येथे आज (रविवार) सकाळीच्या एका अपघातात (Accident) दाेन जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण जखमी (injured) झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान विरार पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. (Virar News)

विरार पूर्व चंदनसार येथील राई पाडा परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने एका गाडीतून चार जण प्रवास करीत हाेते. यामध्ये गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी एका झाडावर जावून आदळली. त्यानंतर गाडीनं दोन तीन पलटी खालल्या. ही गाडी रस्त्याच्या खाली जावून पडली. या घटनेत दिपेश मर्चंडे (२२), जतीन पाटील(२१) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी माहिती दिली की, वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT