India Alliance List Saam Tv
मुंबई/पुणे

India Alliance News: इंडिया आघाडीची ताकद वाढली, आणखी दोन पक्ष झाले सहभागी

India Alliance Meeting in Mumbai: इंडिया आघाडीची ताकद वाढली, आणखी दोन पक्ष झाले सहभागी

Satish Kengar

India Alliance Meeting in Mumbai:

इंडिया आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षाचे ६३ नेते उपस्थित राहणार आहे. याआधी इंडिया आघाडीच्या दोन बैठक पार पडल्या आहे.

ज्यात २६ पक्ष सहभागी झाले होते. मात्र आता इंडिया आघाडीत आणखी दोन पक्ष सहभागी झाले आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकी आधी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, जयंत पाटील आणि इतर महत्वाचे नेते सहभागी झाले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, पहिल्या बैठकीत २६ पक्ष होते. आज २८ पक्ष आघाडीत आले आहेत. ते म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत आघाडीत जे पक्ष होते, त्यांना २३ कोटी ४० लाख मत मिळाले होते.  (Latest Marathi News)

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''भाजपने सांगितले मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्या. मी म्हटलं होतं बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या.'' ते म्हणाले, गॅस सिलिंडरची किंमत कमी झाली. जशी इंडिया आघाडी पुढे जाईल, तसे केंद्र सरकार सिलेंडर मोफत देऊन टाकेल.

यातच शरद पवार म्हणाले की, ''पंतप्रधान यांचं भोपाळ येथील भाषण ऐकलं. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचार केल्याची टीका केली. त्यांनी राज्य सहकारी बँक सिंचन घोटाळा उल्लेख केला. ते पंतप्रधान आहेत, त्यांनी सखोल चौकशी करावी, सत्य परिस्थिती समोर ठेवावी. नुसते आरोप करून उपयोग नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

SCROLL FOR NEXT