रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोर जेरबंद!  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोर जेरबंद!

या दोन चोरट्या महिलांकडून तब्बल ४ लाख, २७ हजार रुपयांचे दागिने रेल्वे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

प्रदीप भणगे

कल्याण : रेल्वे पोलिसांनी दोन महिला अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. रेखा कांबळे (वय ४६), रोजा कांबळे (वय २२) अशी त्यांची नावे असून या दोन चोरट्या महिलांकडून तब्बल ४ लाख,२७ हजार रुपयांचे दागिने रेल्वे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेस गाडीच्या बोगी नं डी-७ या डब्यात गर्दीत चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी संगिता डोमाडे यांच्या शोल्डर पर्सची चेन खोलून आतील ३,०२,४००/- किं.चे सोन्याचे दागिने चोरले होते.

हे देखील पहा :

याबाबत संगीता यांनी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल केला होता. यानंतर तात्काळ रेल्वे पोलीस कामाला लागेल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या व बातमीदाराच्या मदतीने तपास चालू केला. दरम्यान, दिनांक १५ डिसेंबर रोजी चिंचपोकळी रेल्वे स्टेशन पश्चिमेकडील शहर हद्दीत तपास करताना दोन संशयित महिला आढळून आल्या आणि पोलिसांनी त्यांना पकडले.

अधिक तपास केला असता त्यांच्याकडून चोरलेले रु. ३,०२,४००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतर दोन गुन्हांतील रु. १,२५,०००/- किमतीचे सान्याचे दागिने असा एकुण रु. ४,२७,४००/-  किमतीचा ऐवज हस्तगत केला आणि अजून 3 गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आणले आहेत. सदर दोन महिला अट्टल चोरट्या असून रेखा कांबळे (वय ४६), रोजा कांबळे (वय २२) अशी त्यांची नावे आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT