Accident 
मुंबई/पुणे

RTO चाैकात अपघात; आई व मुलाचा मृत्यू; ७ वर्षाची वेदा जखमी

चेतन इंगळे

विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गावरून विरारच्या दिशेने येताना दुचाकीचा पाण्याच्या टँकर बरोबर झालेल्या अपघातात Accident दाेन जण ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास घडली आहे. विरार पूर्व येथे असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमाेर हा अपघात झाला.

या अपघातात दुचाकी चालक योगेश मांडवी, त्याची आई सुनीता मांडवी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात सात वर्षाची वेदा मांडवी ही गंभीर जखमी झालेली आहे. तिला नागरिकांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर टँकर चालक पळून गेला. पाेलिस टँकर चालकाचा शाेध घेताहेत. दरम्यान अपघातास्थळी बघ्यांची गर्दी झाली हाेती.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin deficiency: हात-पाय सुन्न पडत असतील तर शरीरात असू शकते 'ही' कमतरता

Maharashtra News Live Update: शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT