pune news saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राज्यात दोन उपमुख्यमंत्री तर ग्रामपंचायतीत २ उपसरपंच का नको? गावकऱ्यांची जोरदर मागणी

गाव पातळीवर गावचे गटतट संपविण्यासाठी दोन उपसरपंच व्हावं यासाठी ग्रामपंचायत पुढे आली आहे.

रोहिदास गाडगे

Pune News: राज्यात विकास स्वप्न दाखवत शिंदे फडणवीस सरकारला अजित पवारांनी साथ दिली. त्यानंतर राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहे. आता हाच धागा पकडत गाव पातळीवर गावचे गटतट संपविण्यासाठी दोन उपसरपंच व्हावं यासाठी ग्रामपंचायत पुढे आली आहे. (Latest Marathi News)

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले. यावरुन ट्रिपल इंजिन सरकार राज्याला विकासाच्या रुळावर घेऊन जाणार असल्याची स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली.

विकासाची स्वप्न दाखवणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळी उपमा देत डिवचलं आहे.

शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढरे ग्रामपंचायत रांजणगाव एमआयडीसीच्या औद्योगिकीकरणामुळे तळेगाव ढमढेरे विस्तार झपाट्याने होत आहे.

अशातच गावच्या विकासाला स्थानिक गटतटामुळे अडथळे येऊ नये यासाठी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच आणि सदस्य यांनी एकत्रित एकमत करुन ग्रामपंचायत व्हावी यासाठी ठराव करुन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तसा ठराव करुन परवानगी मागितली आहे.

जे राज्यात जळतंय मग तेच गावपातळीवर का नाही, यासाठी आता गावपातळीवर ग्रामस्थांनी पुढे येत राज्याप्रमाणे ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्याला किती उपमुख्यमंत्री असावे याबाबत कायद्यात कुठलीही स्पष्टता नाही.

तसंच ग्रामपंचायतीमध्येही उपसरपंच किती व्हावेत यासाठी स्पष्टता नाही. तरी गावपुढाऱ्यांनी राज्यातल्या झालेल्या सत्तांतरणाचा आधार घेत राज्यात फॉर्मुला गावात राबविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

ग्रामपंचायतील मिनी संसद म्हणून ओळख आहे. गावच्या ग्रामपंचायतींनाही राजकारणामुळे गटातटाची किड लागली आहे. त्यामुळे गावच्या विकासाला खिळ बसलीय आता पहावं लागणार, जसं राज्यात घडलंय, त्याच धर्तीवर गावागावात होणार का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT