Brij Bhushan Singh News: महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कुस्तीपटूंच्या मोठ्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांना शिक्षा देखील होणार असल्याचं म्हटलं जातय. (Latest Marathi News)
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कुस्तीपटू या प्रकरणी न्याय मागत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे संतप्त कुस्तीपटूंनी थेट जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह देशातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून न्याय मागत असलेल्या कुस्तीपटूंना आता अखेर न्याय मिळण्याची शक्यता आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी कुस्तीपटूंचे हे आंदोलन फार चिघळले.
न्याय मिळत नसल्याने त्यांनी जंतरमंतर ते नवीन संसद भवनपर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी नवीन संसद भवनाचे उद्घाटन सुरू असताना बाहेर रस्त्यावर कुस्तीपटूंवर लाठीचार्च करण्यात आला. तसेच त्यांचे आंदोलन जंतरमंतर येथून देखील बंद पाडण्यात आले होते. अशात आता ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात (लैंगिक छळ) ३५४ अ, (धमकी देणे) कलम ५०६, (पाठलाग करणे)३५४ डी आणि (विनयभंग) ३५४ सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.