Mumbai Crime News: बोरिवली पश्चिमेकडील रस्त्यावरील मॅनहोलच्या लोखंडी झाकण चोरीच्या गुन्ह्याखाली एमएचबी कॉलनी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कमलेश (वय 29 वर्षे) आणि अब्दुल (वय 51 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. आर मध्य विभाग बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे प्राजक्ता दवंगे यांनी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात झाकण चोरीची लेखी तक्रार केली होती. (Latest Marathi News)
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी परिसरातील कल्पना चावला रोड येथील डांबरी रोडवरील मॅनहोलचे लोखंडी झाकण चोरी झाल्याबाबत एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. चोरी गेलेल्या झाकणावर MCGM असा मजकूर लिहिलेला होता. अशी एकूण 26 झाकणे विविध भागातून कोणीतीरी अज्ञाताने चोरी केल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यावरून कलम 379 भा.द.वि. अन्वये नोंद करण्यात आला.
या प्रकरणी झोन अकराचे डीसीपी अजयकुमार बंसल आणि एमएसबी कॉलनी पोलीस ठाण्याचे व.पो.नि सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि अखिलेश बाँबे आणि तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये आरोपी कमलेश हा झाकण चोरी करताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौकशी दरम्यान त्याने चोरी केलेली सर्व झाकणे भंगार विक्रेता अब्दुल यास विक्री केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी मॅन हॉल चोरी प्रकरणात या दोघांना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.