Pune Crime
Pune CrimeSaamtv

Pune Crime News: कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या दोघांवर होतोय कौतुकाचा वर्षाव; जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं मोठं बक्षिस...

या हल्ल्यातून तरुणीला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून वाचवले.
Published on

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Jitendra Awhad News: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या दर्शना पवार (Darshana Pawar Case) हत्याकांडाची घटना ताजी असतानाच काल पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील सदाशिव पेठ भागात एका तरुणीवर भरदिवसा तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून तरुणीला दोन तरुणांनी वाचवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या तरुणांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या तरुणांच्या धाडसाचे कौतुक करताना दोघांनाही मोठे बक्षिस जाहीर केले आहे. (Crime News In Marathi)

Pune Crime
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन रोज 5 तास राहणार बंद, प्रवाशांचे होणार हाल; वाचा नेमकं कारण

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात (Pune) एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले.

या हल्ल्यातून तरुणीला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून वाचवले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत असतानाच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांचे सोशल मीडियावरुन कौतुक करत बक्षिस जाहीर केले आहे.

Pune Crime
Maharashtra Politics: CM शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि अशोक चव्हाण एकाच मंचावर येणार, नेमकं काय आहे कारण?

जितेंद्र आव्हाड यांची फेसबूक पोस्ट...

"पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल;" अशा शब्दात त्यांनी या तरुणांचे कौतुक केले आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com