केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल च्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात मसाल्याचे दुकान आहे. बीजी गोयल अँड कंपनी येथे तपासणी करुन हळद पावडर, तीळ व सोयाबीन चंकचे नमुने जप्त केली आहेत. ८ लाख रुपयांचा ४ हजार किलोचा साठा लेबलमधील तुटी व भेसळीच्या संशयावरुन माल जप्त करण्यात आलाय.
काही दिवसापूर्वी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या झाली होती. केतनच्या होणाऱ्या बायकोनेच म्हणजेच सिया गोयलनं आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनला एका उंच कड्यावरून ढकलून दिलं होतं. आधी केतनचा अपघाती मृत्यू झाल्याचं वाटत होतं, सियानेही अपघातच झाल्याचं सांगितलं होतं. परंतु पोलिसांनी जेव्हा याप्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा सियानेच आपल्या मित्राच्या मदतीने केतनची हत्या घडवून आणली होती.
सिया गोयलच्या वडिलांचा मसाल्याचा व्यवसाय असून पुण्यातील मार्केट यार्डमध्ये त्यांचे दुकान आहे. त्या दुकानावर एफडीएनं छापा टाकलाय. कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. व्यवसायाचा परवाना नसून दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत एफडीएने दुकान सील केले आहे. तसेच आठ लाख रुपये किमतीचा 4 हजार किलो माल जप्त करण्यात आला आहे. हा सिया गोयलच्या कुटुंबियांना मोठा धक्का मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.