FDA officials seized banned oxytocin injections during a raid at a cattle shed in Ulhasnagar to curb illegal milk production practices. saam tv
मुंबई/पुणे

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

FDA Raid On Illegal Oxytocin Injections In Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई; जादा दूध उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या ६१२ बंदी घातलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त. तुकाराम मुंडे यांच्या धडक मोहिमेमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण.

Omkar Sonawane

अजय दुधाने, साम टीव्ही

उल्हासनगर: राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ, बेकायदेशीर औषधांचा वापर आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उल्हासनगरमध्ये देखील FDA ने मोठी कारवाई केली आहे. अधिक दूध उत्पादनासाठी म्हशींना दिली जाणारी बंदी घातलेली ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली असून तब्बल ६१२ प्रतिबंधित इंजेक्शन्सचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी यांच्या तबेल्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जास्त दूध उत्पादनासाठी वापरली जाणारी ६१२ ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स तसेच त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ऑक्सिटोसिनचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो.

इतकेच नव्हे, तर अशा दुधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या औषधाच्या वापरावर कायद्याने बंदी घातली आली आहे. राज्यात सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, बेकायदेशीरपणे जनावरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT