truck drivers strike affected apmc market vegetables in navi mumbai  saam tv
मुंबई/पुणे

Truck Driver Strike: एपीएमसीत शुकशुकाट, मुंबईत भाज्यांचे दर वाढणार; नागपुरातील संत्रा लिलाव ठप्प

या संपामुळे शेतक-यांच्या शेतमालाचे देखील नुकसान हाेत आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे / पराग ढोबळे

Navi Mumbai News :

नव्या हिट अॅड रन कायदा (New Hit And Run Law) विराेधात आज (मंगळवार) दुस-या दिवशी देखील राज्यभरात ट्रक चालकांचे (truck driver strike) आंदाेलन सुरु आहे. यामुळे ट्रक चालकांच्या संपाचा काहीसा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटवर झाला आहे. (Maharashtra News)

या आंदाेलनामुळे एपीएमसी बाजारात परराज्यातील माल आलेला नाही. राज्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात झाली आहे. परिणामी भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यानी घटली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान सध्या एपीएमसीत ग्राहक देखील घटल्याचे आज दिसून आले आहे. त्यामुळे भाजीपाल्याला म्हणावा तितका उठाव झालेला नाही. ट्रक चालकांचा संप सुरु राहिल्यास भाजीपाल्यांची आवक ठप्प होऊन त्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढतील अशी शक्यता व्यापा-यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

संत्रा नगरीस संपाचा फटका

नागपूरची ओळख ही संत्रा नगरी म्हणून देखील आहे. सध्या ट्रक चालकाचा संपाचा परिणाम संत्रा बाजारपेठेवर पडलेला दिसून येत आहे. आवक घटल्यामुळे संत्राचे दर वाढलेले दिसत नाही. तरी देखील बाजारात व्यापारी संत्रा खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.

या संपामुळे संत्रा बाहेर पाठवू शकत नसल्यामुळे संत्रा लिलावाकडे देखील अनेकांनी पाठ फिरवली आहे. याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना आणि ज्यांनी संत्रा घेऊन आले आहेत त्या व्यापारी वर्गास बसत आहे.

ट्रक चालकाच्या संपामुळे संत्रा गाडी भरली होत नाही. संत्रा उपलब्ध असताना बाजार ओस पडला आहे. यामुळे दोघांनाही या फटक्याचा परिणामाला समोर जाव लागत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT