Ration Shop Owners On Strike: रेशन दुकानदार बेमुदत संपावर, राज्यातील स्वस्त धान्य याेजना ठप्प

राज्यातील तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज रेशन दुकानदार धरणे आंदोलन करणार आहेत.
ration shop owners on indefinite strike from today
ration shop owners on indefinite strike from todaysaam tv
Published On

- सचिन जाधव

Pune News :

विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेला बेमुदत संपात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ सहभागी झाला आहे. यामुळे आजपासून (साेमवार) राज्यातील रेशनची दुकानांवर टाळे (ration shop owners on indefinite strike from today) दिसत आहे. (Maharashtra News)

रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, मार्जिन मनी ३०० रुपये करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

ration shop owners on indefinite strike from today
Hit And Run New Law: ट्रक चालकांचा नव्या कायद्याला विरोध; नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनास प्रारंभ

पुणे जिल्ह्यातील अडीच हजार रेशन दुकानदार तसेच सातारा जिल्ह्यातील 1707 दुकानदार या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आज रेशन दुकानदार धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिका-यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

ration shop owners on indefinite strike from today
Navegaon Nagzira Tiger Reserve : ताडोबातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार तीन वाघ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com