Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: विवाहितेचा शारीरिक अन् मानसिक छळ करून ट्रिपल तलाक; पतीला अटक

Pune News: या घटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

Shivani Tichkule

सचिन जाधव

Pune Crime News Today: विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने पतीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भात २३ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती आणि सासरच्या लोकांनी विवाहितेवर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पतीने तीन वेळेस तलाक म्हणत नांदवण्यास नकार दिला. (Latest Marathi News)

तसेच, पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून खडकी पोलिसांनी पती अकीब आयुब मुल्ला (वय ३१, रा. नवीन नाना पेठ, पद्मजी पार्क, पुणे) याला अटक केली. या प्रकरणी पतीसह सासू, सासरा आणि इतर २ नातेवाईकांविरोधात खडकी पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

त्याच्याविरुद्ध ९ मे रोजी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी २३ मे रोजी पतीला ट्रिपल तलाकच्या गुन्ह्यात अटक केली. ट्रिपल तलाकप्रकरणी पतीला अटक झाल्याची ही पुण्यातील (Pune) पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. ही घटना २३ डिसेंबर २०२२ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली. पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील ऐतिहासिक स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास होणार; रविंद्र चव्हाणांनी दिली महत्त्वाची माहिती

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT