Manohar Joshi Health Update: मनोहर जोशी यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; प्रकृती स्थिर, उपचार सुरु

22 मे रोजी मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Manohar Joshi
Manohar JoshiSaam Tv

निवृत्ती बाबर

Manohar Joshi News Today: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृती बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या ते हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. हिंदुजा रुग्णालय प्रशासनाकडून काल रात्री ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 22 मे रोजी मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Latest Manohar Joshi Health Update News)

मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहेत. अशात २२ मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या प्रकृतीमुळे गेल्या काही काळापासून मनोहर जोशी राजकारणात सक्रिय नाहीत.

Manohar Joshi
Politics News : Deepak Kesarkar यांच्या वक्तव्याला Vinayak Raut यांचे प्रत्युत्तर...

मनोहर जोशी (Mahohar Joshi) हे मूळचे बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावात झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणूनही नोकरी केली.

विधानपरिषदेत शिवसेनेकडून निवडून येत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. मुंबईच्या महापौरपदही त्यांनी काम केलं आहे. यावेळी 1976 ते 1977 या कार्यकाळात त्यांनी उत्तम कामे केली. तसेच शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले आहे.

Manohar Joshi
Devendra Fadnavis Live : समृद्धी महामार्गाला विरोध केला होता पण... ; फडणवीस यांची ठाकरेंवर टीका

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com