अपंग आणि विशेष व्यक्तींना अंबरनाथ पालिकेचा आधार; पुनर्वसन केंद्राद्वारे उपचार सुविधा अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अपंग आणि विशेष व्यक्तींना अंबरनाथ पालिकेचा आधार; पुनर्वसन केंद्राद्वारे उपचार सुविधा

अपंग आणि विशेष व्यक्तींना अंबरनाथ पालिकेचा आधार मिळाला आहे. पुनर्वसन केंद्राद्वारे उपचार सुविधा अंबरनाथ पालिकेकडून देण्यात येत आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथ पालिका प्रशासनाने आधार पुनवर्सन केंद्राच्या वतीने शहरातील अपंग आणि विशेष मुलांना उपचार आणि थेरेपी उपलब्ध करून दिली आहे. पालिकेकडे नोंदणी केलेल्या अपंग आणि विशेष व्यक्तींवर या केंद्रामध्ये विनामूल्य उपचार केला जातो. अश्या प्रकारे अपंग आणि विशेष मुलांना सुविधा देणारी अंबरनाथ ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे. (Support of Ambernath Municipality for the disabled and special persons; Treatment facility through rehabilitation center)

हे देखील पहा -

या केंद्रात विविध विषयीतील तज्ञ डॉक्टरांचीही सुविधा अपंगांना मिळते. अंबरनाथ पालिकेत शहरातील 800 अपंग, विशेष मुलांची नोंद आहे. त्या सर्वांना या केंद्राचा विनामूल्य लाभ दिला जातो. गेल्या सहा महिन्यांत शहरातील 70 अपंग आणि विशेष व्यक्तींनी या सुविधेचा लाभ घेण्यास सुरूवात केली आहे. शहराच्या पश्चिम विभागातील चिखलोली येथील सर्योदय नगरमध्ये हे केंद्रे आहेत. पालिकेकडे नोंदणी केलेल्या अपंग आणि विशेष मुलांना घरून केंद्रात येण्यासाठी तसेच केंद्रातून घरी जाण्यासाठी विनामूल्य वाहनसेवा आहे.

सोमवार ते शनिवार सकाळी 10 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे केंद्र सुरू असते. रविवारी केंद्रात झुंबा या पाश्चात्य नृत्य प्रकाराचे वर्ग घेतले जातात. या केंद्रात निरनिराळी खेळणी, थेरेपीच्या यंत्रणा आहेत. अगदी नऊ महिन्यांच्या मुलापासून 60 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती सध्या या केंद्राचा लाभ घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT