Aryan Khan Case: भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणाही ड्रग्स पार्टीत - नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
Aryan Khan Case: भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणाही ड्रग्स पार्टीत - नवाब मलिकांचा गौप्यस्फोटSaam Tv News

Aryan Khan Case: भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणाही ड्रग्स पार्टीत - नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या १० पैकी २ लोकांना सोडून दिलं होतं. त्यातला एकजण हायप्रोफाईल भाजप नेत्याचा मेहुणा असल्याचा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
Published on

मुंबई: एनसीबीनं (NCB) केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. बॉलिवुड अभिनेता शाहरुख (Shahrukh Khan) खान याचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) ८ ते १० लोकांना ताब्यात घेलल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede NCP) यांनी दिली होती. मात्र ताब्यात घेतलेल्या १० पैकी २ लोकांना सोडून देण्यात आलं होतं आणि त्यातला एकजण हायप्रोफाईल भाजप नेत्याचा मेहुणा असल्याचा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ पुराव्यांसह आपण त्या अधिकाऱ्याचं नाव जाहिर करणार असल्याची माहिती त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे. (Aryan Khan Case: Brother-in-law of BJP's high profile leader in drugs party - Nawab Malik's controversial statement)

हे देखील पहा -

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे. एक अधिकारी आठ ते दहा जणांना ताब्यात घेतलं असं सांगतो, एकतर आठ असेल किंवा दहा असेल. दहापैकी दोघांना का सोडलं आणि समीर वानखेडे यांनी कोणत्या भाजप नेत्याच्या फोनवरुन दोघांना सोडलं हे उद्या पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचं ते म्हणाले. त्याचप्रमाणे कलाकारांवर प्रचंड दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप त्यांनी केला.

उप-मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या कारवाईबाबत ते म्हणाले की, आयकर खात्याचा (IT Raid) वापर करुन अजित पवारांना बदनाम केलं जातंय. पवारांच्या नातेवाईकांवरील कारवाई सुडबुद्धीने केली जातेय. लोकांना धाकात आणि घाबरवून ठेवण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय असंही मलिक म्हणाले. त्याचप्रमाणे आम्ही कारवाईला घाबरत नसून सरकारचं काम जोरदार सुरु आहे. जर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप (NCP Vs BJP) असा संघर्ष होणार असेल तर होउद्या आम्ही तयार आहोत असं आव्हानच त्यांनी विरोधकांना केलं आहे.

Aryan Khan Case: भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणाही ड्रग्स पार्टीत - नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली: चिनी सैनिकांना घेतलं ताब्यात

उद्या दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांचे बँक घोटाळे (BJP's Scams) बाहेर काढणार आणि एनसीबी विरुद्ध पुरावे सादर करणार तसेच एनसीबीनं छापेमारी करत ताब्यात घेऊन सोडून दिलेल्या दोघांची नावे जाहिर करणार सोबतच त्या हायप्रोफाईल भाजप नेत्याचंही नाव जाहिर करणार असल्याचा माहितीवजा इशारा नवाब मलिक यांना दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com