Digha Railway Station Opening Update: Trans Harbour Digha Railway Station Inaugurated by PM Narendra Modi on 12 January 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Digha Railway Station: प्रतीक्षा संपली; दिघा रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; PM मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

Digha Railway Station Opening Update: नवी मुंबईतील ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडणार आहे. 6 महिन्यांपासून दिघा गाव रेल्वे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होतं.

प्रविण वाकचौरे

Navi Mumbai News :

ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्टेशनचं उद्घाटन कधी होणार, असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला होता. नागरिकांचा गेल्या काही महिन्यांपासूनची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. उद्या म्हणजे १२ जानेवारी रोजी दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे.

नवी मुंबईतील ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडणार आहे. 6 महिन्यांपासून दिघा गाव रेल्वे स्थानक तयार असून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होतं. दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उदघाट्न व्हावे यासाठी अनेक राजकीय पक्षांनी विविध आंदोलन केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे दिघा परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

दिघा रेल्वे स्टेशन मागील अनेक महिन्यांपासून तयार आहे. मात्र उद्घाटन न झाल्याने ते सुरु झाले नव्हते. शिवसेना खासदार राजन विचारे यांनी वारंवार याबाबत आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी देखील येथे भेट देऊन स्टेशन लवकरात लवकर सुरु करण्याची विनंती रेल्वे मंत्र्यांना केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी रोजी देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' (MTHL) चे उद्घाटन करतील. याशिवाय उरण रेल्वे मार्गाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्याचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. त्याचा विस्तार खारकोपर ते उरणपर्यंत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: पैसे वाटणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

SCROLL FOR NEXT