Train Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

Train Accident near karjat : मध्य रेल्वेवरील कर्जत लोणावळाजवळ मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प झालाय.

Vishal Gangurde

विकास मिरगणे, साम टीव्ही

मुंबई : कर्जत-लोणावळाजवळ शुक्रवारी सांयकाळी चार वाजता मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे. मंकी हिलजवळ मालगाडी घसरल्याची माहिती मिळत आहे. यामुळं लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. या अपघातामुळे कर्जत आणि पळसधरी येथून पुण्याकडे जाणारी रेल्वे थांबवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे रेल्वे मार्गांवर खंडाळाजवळ मंकी हिलला मालगाडी बोगीची चाके निखळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. खंडाळा घाटात मंकी हिलजवळ पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षा रक्षक बोगीची चाके निखळून पडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक घाटात थांबवण्यात आली आहे.

मुंबईहून पूण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वे आणि मालगाड्या कर्जत, पळसधरी मार्गांवर थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मालगाडी घसरल्यामुळे सोलापूर वंदे भारत, जोधपूर हडपसर एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेसवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकही घटनास्थळी पोहोचले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मालगाडी रुळावर आणण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT