
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी काल तातडीने दिल्ली गाठली. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली. संजय राऊतांच्या टीकेला प्रत्यु्त्तर देताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टोकदार टीका केली. 'तुमचा मालक बाटगा असून त्याची काळजी करा. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेससोबत जाऊन झूकले वाकले. त्यांच्या गळ्यात काँग्रेसचे मंगळसूत्र आणि टीळा राष्ट्रवादी शरद पवारांचा होता, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट भाजपात विलीन होईल, असा दावा केला आहे. संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं की, 'संजय राऊत असे म्हटले की एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि म्हणाले मी माझा पक्ष भाजपात विलीन करेल, मला मुख्यमंत्री करा असे त्यांनी सांगितले. पण राऊतसाहेब एकनाथ शिंदे, रामदास कदम आम्ही सगळे निधड्या छातीचे शिवसैनिक आहोत. कडवे शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत आमच्या खांद्यावरचा भगवा झेंडा खाली जाणार नाही'.
'तुमचा मालक बाटगा आहे, त्याची काळजी करा. शिवसेना-भाजप म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेससोबत जाऊन झूकले वाकले. काँग्रेसचे मंगळसूत्र आणि टीळा राष्ट्रवादी शरद पवारांचा होता. भांडी घासायला गेले, तिकडे तुमच्या मालकांनी भ्याडपणा केला, अशी टीका रामदास कदम यांनी ठाकरेंवर केली.
'तुम्ही दाढी अफजलखान आणि औरंगजेबाची आहे असे म्हणालात. मोगलांचे घोडे पाणी प्यायला जायचे, त्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे. तशी तुमची अवस्था झाली आहे. तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदेंच दिसतात. तुम्ही इतके घाबरले की, त्यांनी घाम फोडला. ही दाढी कडव्या शिवसैनिकाची आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची दाढी असल्याने त्यांनी तुम्हाला पाणी पाजलं, तुमचा टांगा उलटा केला, असेही ते पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.