पालघरजवळ वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग
विरार ते डहाणू लोकल सेवा अडीच तासांपासून ठप्प
वांद्रे वेरावल एक्सप्रेससह अनेक गाड्या विरार स्थानकात अडकल्या
मनोज तांबे, साम टीव्ही
पालघरच्या केळवे रेल्वे स्थानकात रेल्वे गाडीच्या इंजिनमध्ये आग लागल्यामुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे वांद्रे वेरावल एक्स्प्रेस तब्बल दीड तासांपासून विरार रेल्वे स्थानकात उभी आहे. तर विरार ते डहाणू लोकलसेवा मागील अडीच तासांपासून बंद आहे. यामुळे विरारकडून पालघरकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.
रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मुंबईहून गुजरातला निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या पालघरजवळील केळवे रेल्वे स्थानकावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या वलसाड एक्स्प्रेसला इंजिनला साधारणतः आठ वाजताच्या सुमारास आग लागली होती. या आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. या आगीमुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवासह लांबपल्यांच्या गाड्या प्रभावित झाल्याचं पाहायला मिळतंय.
सध्या आग लागलेलं इंजिन गाडीपासून वेगळं करण्यात आलं असून प्रवाशांनी घाबरून न जाता गाडीतून खाली उतराव, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतंय. दरम्यान आता हे इंजिन गाडीपासून वेगळं करण्यात आलं आहे. परंतु आता गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वसई विरारसह काही रेल्वे स्थानकांवर रोखून धरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे .
वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग कधी लागली?
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केळवे रेल्वे स्थानकाजवळ वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली.
इंजिनला लागलेल्या आगीमुळे काय परिणाम झाला?
विरार ते डहाणू दरम्यानची लोकलसेवा बंद झालीये. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही उशीराने धावत आहेत.
इंजिनला लागलेल्या आगीचं कारण काय आहे?
इंजिनला लागलेल्या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.