पुण्यातील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये दुर्दैवी घटना
बास्केटबॉल स्टँड अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले पण उपचाराआधी मृत घोषित
या घटनेनंतर विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी प्राचार्याच्या निलंबनाची मागणी केली
बास्केटबॉल खेळताना पुण्यात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मावळच्या इंदुरी येथील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली. बास्केटबॉलचा स्टँड अंगावर कोसळून हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विशाल वर्मा असं या विद्यार्थ्याचे नाव होते. त्याच्या मृत्यूनंतर इन्स्टिट्यूटमध्ये एकच खळबळ उडाली असून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटच्या प्राचार्याच्या निलंबनाची मागणी केली. या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या आवारात विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होते. याचवेळी बास्केटबॉलचा स्टँड विशाल वर्मा या विद्यार्थ्याच्या अंगावर कोसळला. या घटनेत विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या विशालला तातडीने तळेगाव येथील मायमर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संस्थेच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इन्स्टिट्यूटमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे. नेमकी घटना कशामुळे घडली याचा शोध पोलिस घेत आहेत. विशाल वर्मा हा विद्यार्थी द्वितीय वर्षात शिकत होता. त्याच्या मृत्यूनंतर इतर विद्यार्थी आक्रमक झाले असून प्राचार्याच्या निलंबनाची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे कॅम्पसमधील वातावरण सकाळपासून तापले असून कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना खेदजनक असून संबंधित प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती संस्थेचे प्राचार्य संजीत कनूंगो यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.