अखेर प्रतीक्षा संपली! डोंबिवलीतील रेतिबंदर पूल आता लवकरच उभा राहणार

Retibandar Railway Flyover Project In Dombivli Latest Update: डोंबिवलीतील रेतिबंदर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलासाठी केडीएमसीने निविदा जाहीर केली आहे. चार लेनच्या या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
Proposed site of the Retibandar railway flyover in Dombivli, where construction is expected to begin soon.
Proposed site of the Retibandar railway flyover in Dombivli, where construction is expected to begin soon.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली पश्चिम येथील रेतिबंदर रोडवरील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक १ येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूलाच्या कामासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत निविदा जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे डोंबिवलीकरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर गती मिळाली आहे. डोंबिवली पश्चिम आणि पूर्व भागांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून सध्या रेल्वे फाटकामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत नागरिकांना दीर्घकाळ थांबावे लागते. याचा परिणाम केवळ दैनंदिन प्रवासावरच नाही, तर रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांवरही होत असल्याचे चित्र आहे.

Proposed site of the Retibandar railway flyover in Dombivli, where construction is expected to begin soon.
जेवणानंतर कलिंगड खाणं जीवावर बेतलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या प्रकल्पासाठी आमदार रवींद्र चव्हाण तसेच नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा विषय प्रशासनाच्या पातळीवर प्रभावीपणे पुढे आला. विशेष म्हणजे, सुरुवातीला हा उड्डाणपूल दोन लेनचा प्रस्तावित होता. मात्र दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर आता हा पूल चार लेनचा करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन अधिक सक्षम रस्तेव्यवस्था उपलब्ध होणार आहे.

Proposed site of the Retibandar railway flyover in Dombivli, where construction is expected to begin soon.
Sabja Seeds Recipe: नुसतं सब्जा पाणी पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा 'या' ५ चविष्ट आणि हेल्दी रेसिपी, उन्हाळ्यात वजन होईल कमी

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल, तसेच नागरिकांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. एकूणच, डोंबिवली शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव सुधारणा घडवून आणणारा हा प्रकल्प ठरणार असून शहराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com