Mumbai News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: पाण्याची टाकी साफ करताना अनर्थ घडला, ५ सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Nagpada Tragedy: मुंबईतल्या नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. या बिल्डिंगमध्ये पाण्याची टाकी साफ करताना ५ कामगारांचा मृत्यू झाला.

Priya More

मुंबईमध्ये पाण्याच्या टाकीची सफाई करताना ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतल्या नागपाडा परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी एका इमारतीची पाण्याची टाकी साफ करत असताना ५ कामगार बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून या पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. ही बिल्डिंग दिमटिमकर रोडवरील गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ आहे. या बिल्डिंगमधील पाण्याची टाकीच्या सफाईचे काम सुरू होते. पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी ५ सफाई कामगार आतमध्ये उतरले होते. पण गुदमरल्यामुळे ते आतमध्येच बेशुद्ध पडले.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना आज सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ५ कंत्राटी कामगार पाण्याची टाकी साफ करताना गुदमरल्याची घटना घडली. त्यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून तात्काळ नजीकच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. गुदमरून या कामराचा मृत्यू झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT