Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : ५० मजूरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी

Mokhada Nashik Road Accident : मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तोरंगण घाटात ५० मजुरांनी भरलेला ट्रक ब्रेक फेल झाल्याने दरीकडे पलटी झाला. एका मजुराचा मृत्यू तर ४० हून अधिकजण जखमी असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

Alisha Khedekar

  • ५० मजुरांनी भरलेला आयशर ट्रक ब्रेक फेल होऊन तोरंगण घाटात पलटी

  • एका मजुराचा जागीच मृत्यू, ४० हून अधिक जखमी

  • गंभीर जखमींना नाशिक व त्र्यंबकेश्वर रुग्णालयात हलविण्यात आले

  • स्थलांतरित मजूर कमी भाड्यात मालवाहतूक वाहनांतून प्रवास करतात

फय्याज शेख, पालघर

पालघर जिल्ह्यातील मोखाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. मोखाड - त्रंबकेश्वर - नाशिक रस्त्यावरील तोरंगण घाटात एका आयशर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने दरीकडील बाजूला ट्र्क पलटी झाला. या ट्र्कमधून ५० कामगार प्रवास करत होते. या अपघातात सुभाष दिवे (वय 28, रा. हाडे, जव्हार) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक मजूर जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना तातडीने त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तर काहींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी कामासाठी जातात. हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा यासाठी मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेत असतात. अशावेळी सहा ते सातच्या आसपास नाशिक वरून मोखाड्याकडे येणाऱ्या एका आयसर ट्रकमध्ये तब्बल ५० हून अधिक मजूर बसले होते. यानंतर तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. त्यांनतर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात याबाबत कळविण्यात आले आणि रुग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४० हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना नाशिक रुग्णालयात देखील हलवण्यात आले आहे.

मोखाडा तालुक्यात सध्या स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यासाठी मोखाड्यातील अनेक मजूर मोखाडा त्रंबक रस्त्यावरील फाट्यावर येऊन उभे राहतात. कमी भाड्यामध्ये गाडी मिळावी म्हणून मालवाहतूक वाहनांमध्ये प्रवास करतात. शिवाय येताना सुद्धा मजुरी मिळाल्यानंतर अशाच वाहनांचा ते आधार घेतात. एकीकडे स्थानिक पातळीवर रोजगार नाही दुसरीकडे रोजगारासाठी आपला जीव दररोज धोक्यात घालावा लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत बिल्डरवर धाडधाड गोळ्या झाडल्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Miss Universe 2025: १३० देशांना मागे टाकत; 'या' देशाच्या फातिमाने पटकावला मिस युनिव्हर्सचा किताब

Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी, ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री पदावरून जुंपली, उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची काँग्रेसच्या हायकमांडसोबत भेट, कर्नाटकात राजकीय भूकंप?

SCROLL FOR NEXT