Mokhada
Mokhada Saam tv

Mokhada : ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर; वैद्यकीय अधिकारी नसल्याने बालकाचा मृत्यू?, नातेवाईकांचा आरोप

Mokhada Shahapur News : बाल मृत्यू घडल्याने कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे मुंबईपासून जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांवरील आरोग्य यंत्रणेची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे
Published on

फैय्याज शेख 

शहापूर : आदिवासी परिसरात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याच्या पुन्हा एकदा अनुभवण्यास आले आहे. यात मोखाडा ग्रामीण रुग्णालयात २२ ऑक्टोबरला नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसूती दरम्यान केवळ एक परिचरिका उपलब्ध होती. पण डॉक्टर हजर नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे या महिलेला बुधवारी (२२ ओक्टोम्बर) सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. असह्य प्रसूती वेदना जाणवल्या नंतर महिलेची प्रसूती रात्री १० वाजेच्या दरम्यान करण्यात आली. नवजात बालकाला दोन नाळ होत्या तसेच बाळाची प्रकृतीही चांगली नव्हती. महिलेची प्रसूती झाली, यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नव्हता. तर केवळ एकच परिचारिका उपलब्ध असल्याने योग्य ते उपचार करता आले नाही. 

Mokhada
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता, ऑक्टोबरचे ₹१५०० कधी मिळणार?

नातेवाईकांकडून आरोप 

ही बाब खोडाळा येथील सोनोग्राफीमध्ये समोर आली होती. तथापी या ठिकाणी कोणतेही प्रसूतीतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामूळे कोणताही सल्ला मिळाला नाही. प्रसूतीत मोठी प्रतिक्षा करावी लागल्याने व तज्ज्ञांचा योग्य सल्ला मिळाला नसल्यामुळे सदर महिलेचे बाळ दगावले; असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रसूतीनंतर बालक आणि सदर महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही रुग्णालय प्रशासनाने केला आरोप आहे. 

Mokhada
Crime: संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याची हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून संपवलं; पिंपरी-चिंचवड हादरले

आरोग्य यंत्रणेची दुरावस्था 

बारा तासांत आरोग्य सुविधांचा अभाव आणि वैद्यकीय सल्ला न मिळाल्याने महिलेला ऐन दिवाळीत आपले बालक गमवावे लागले असा आरोप आहे. वैशाली बात्रे असे पीडित महिलेचे नाव असून ऐन दिवाळीत बाल मृत्यू घडल्याने कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे मुंबईपासून जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांवरील आरोग्य यंत्रणेची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com