Mumbra Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: मुंब्र्यात थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरखाली चिरडून ३ मुलांचा मृत्यू

Mumbra Accident: मुंब्रामध्ये थरारक अपघाताची घटना घडली. भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली येऊन ३ मुलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळावर तणावाचे वातावरण आहे.

Priya More

Summery -

मुंब्रामध्ये भयंकर अपघाताची घटना घडली.

भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली.

कंटेनरच्या चाकाखाली चिरडून ३ मुलांचा जागीच मृत्यू झाला

या अपघातानंतर घटनास्थळावर तणावाचे वातावरण आहे.

मुंब्रामध्ये अपघाताची भयंकर घटना घडली. भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने चिरडलं. या अपघातामध्ये तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रामधील गावदेवी बायपासजवळ ही अपघाताची घटना घडली. या अघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली. घटनास्थळावर सध्या तणावाचे वातावरण आहे. मुंब्रा पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रामध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर अपघात झाला. गावदेवी बायपास परिसरात ३ मुलांना कंटेनरने चिरडलं. बाईकवरून ही तिन्ही मुलं चालले होते. त्यावेळी कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली येऊन या तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिघांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच फायरब्रिगेड, रुग्णवाहिका आणि मुंब्रा पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तिन्ही मुलं कामासाठी दुचाकीवरून ठाण्यातून शिळफाटा येथे जात होते त्याचवेळी ही भयंकर घटना घडली.

स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. घटनास्थळावर तणावाचे वातावरण आहे. मुंब्रा बायपासवर नेहमी अशा प्रकारचे अपघात होत असतात. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT