Mumbai Road Accident Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Mumbai Road Accident : मुंबईत पुन्हा एकदा धोकादायक रस्त्याने बळी घेतला आहे. छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पवईतील रस्त्यावर अपघातात २४ वर्षीय राहुल विश्वकर्मा यांचा मृत्यू

छटपूजा आटोपून घरी परतताना दुचाकी घसरल्याने घडली दुर्घटना

गेल्या दोन महिन्यांत या धोकादायक रस्त्यावर तीन मृत्यूंची नोंद झाली आहे

नागरिकांकडून रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजनांची मागणी

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईच्या पवई परिसरात पुन्हा एकदा धोकादायक रस्त्याने तरुणाचा बळी घेतला आहे. पवई प्लाझा, जेव्हीएलआर समोर रविवारी रात्री घडलेल्या अपघातात २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राहुल विश्वकर्मा असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा पवई येथे छटपूजा आटोपून आपल्या बहिणीसह विक्रोळी येथे घरी परतत होता. जेव्हीएलआरवरील असमान आणि पॅच असलेल्या रस्त्यावरून त्याची दुचाकी घसरली. त्यात तो रस्त्यावर कोसळला. त्याच वेळी बाजूने जाणाऱ्या खासगी बसने त्याला चिरडलं. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धोकादायक रस्त्यामुळे गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी मृत्यूची घटना असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी ते रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत आहेत. स्थानिकांनी तातडीने रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

SCROLL FOR NEXT