Mumbai Shocking News : Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Shocking : मुंबईत २१ मजली इमारतीची कार लिफ्ट कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

Mumbai Shocking News : मुंबईत २१ मजली इमारतीची कार लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागात कार लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिम लिंक रोड येथील एका २१ मजली इमारतीची कार लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागात कार लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली. बोरिवली पश्चिमेकडील लिंक रोड येथील ओम प्रथमेश इमारतीची कार लिफ्ट सात फूट खाली कोसळून दुर्घटना झाल्याची घटना घडली आहे. ओम प्रथमेश ही 21 मजली इमारत असून आज शनिवारी सकाळी लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दुर्घटना घडल्यानंतर लिफ्ट खाली अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना एम एच बी कॉलनी पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. त्यांना पोलिस व्हॅनमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र उपचारापूर्वीच शुभम मदनलाल धुरी या 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

इमारत दुर्घटनेत गंभीर जखमी असलेल्या ४५ वर्षीय सुजीत यादव या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लिफ्ट कोसळल्याच्या घटनेची एम एच बी कॉलनी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हवा आहे? अवश्य फॉलो करा 'या' वास्तु टिप्स

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Beed News: धनंजय मुंडेंचं आयुष्य उद्ध्वस्त करून वाल्मिक कराडला मंत्री व्हायचं होतं – बाळा बांगरांचा गंभीर दावा|VIDEO

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

IRCTC Rule: रेल्वेचा मोठा निर्णय! तब्बल २.५ कोटी युजर्सचे अकाउंट केले निष्क्रिय; या नियमात केले बदल

SCROLL FOR NEXT