Mumbai LiveMusic Concert Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबई हादरली! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ड्रग्जच्या ओव्हर डोसने घेतला जीव

Mumbai LiveMusic Concert: मुंबईमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान भयंकर घटना घडली. मद्यपान आणि ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एक तरुण आणि एका तरुणाचा समावेश आहे.

Priya More

Summary -

  • गोरेगावमध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भयंकर घटना

  • ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

  • एक तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत

  • पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्यामुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईतल्या गोरेगावमध्ये या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. या कॉन्सर्टला आलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्ज घेतलं होतं. पण या ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली. आज उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात ११ एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तीन ते चार हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान जास्त प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्यामुळे काही तरुणांना त्रास झाला. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे यातील २ तरुणींना मुंबईच्या जोगेश्वरी येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

तर एका मुलाला गोरेगाव पश्चिमेकडील लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. लाईफ लाईन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र ट्रामा केअर रुग्णालयातील तरुणींना डिस्चार्ज दिल्यानंतर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अखेर आज दुपारी त्यापैकी एका तरुणीचा मृत्यू झाला असून दुसरीवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहे. या तरुणीची प्रकृती गंभीर आहे.

याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाले नाहीत. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. वनराई पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT