सुप्रीम मस्कर, साम टीव्ही
इमानदार, राखणदार म्हणून त्याला बिरुदावल्या दिल्या जातात. कोणाचा मोती, कोणाचा राजा तर रोज दारात येऊन बसतो म्हणून या ना त्या नावानं भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणारे असंख्य आहेत. मात्र हिच भटकी कुत्री आता लोकांच्या जीवावर उठलीयेत.
बदलापुरात भटक्या कुत्र्याच्या चाव्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. रितिका करोचिया नावाची चिमुरडी घराच्या मागे मुलांसोबत खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने रतिकाच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर तिचा रेबीजचे दोन इंजेक्शनचा कोर्स झाल्यानंतरही रुचिकाची तब्येत बिघडली आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने वेळीच पावले उचलावी अशी मागणी रुचिकाच्या कुटुंबियांनी केलीय.
राज्यातल्या अशा घटनांच्या संख्येवर एक नजर टाकूया...
राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत -
जानेवारी 2025 मध्ये उल्हासनगरात 335 नागरिकांना कुत्र्याचा चावा
मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन नागरिकांचा मृत्यू
2024 मध्ये पुणे शहरात एकूण 23,374 भटक्या कुत्र्यांचा चावा
दररोज सरासरी 81 नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा
गेल्या 3 वर्षात 2 लाख 14 हजार 950 मुंबईकरांना कुत्र्यांचा चावा
मुंबईच्या रस्त्यांवर हिंडतात 91 हजार भटके कुत्रे
2024 मध्ये 13 हजार नागरिकांना कुत्र्याचा चावा
जानेवारी 2025 मध्ये ठाण्यात शहरात 10,000 भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना चावा
दररोज सरासरी 333 नागरिक भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांनी जखमी
राज्यातील ही आकडेवारी निश्चितच गंभीर आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर येथे पाच वर्षांच्या श्याम राठोड या चिमुरड्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सातत्यानं वाढ होत असताना प्रशासन मात्र ढिम्म आहे. उदासिन प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नाहीत.
उघड्यावर कचरा न टाकता आपला परिसर स्वच्छ कसा राहील याबाबत नागरिकांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनाला प्राणी प्रेमी संघटना, सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला तर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.