Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांनी केली आणखी एक मोठी कारवाई

Vaishnavi Hagawane Case update : वैष्णवी हगवणे प्रकरणी महत्वाची अपडेट हाती आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.
Vaishnavi Hagawane case news
Vaishnavi Hagawane caseSaam Tv News
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे राजेंद्र हगवणे आणि शंशाक हगवणेच्या मुसक्या आवळल्या. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर दोन्ही पिता-पुत्र फरार झाले होते. गेल्या सहा-सात दिवसांपासून पोलीस दोघांच्या शोधावर होते. पोलिसांनी काल दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आज पोलिसांनी राजेंद्र हगवणे पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी जप्त केली आहे.

Vaishnavi Hagawane case news
Shocking : खळबळजनक! घरात घुसून बायको आणि मुलांसमोरच पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी जलद गतीने कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीचे दोन भाऊ विराज आणि पृथ्वीराज आणि एका मैत्रिणीचा जबाब नोंदवला आहे. तसेच स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आली आहे. त्यात पाच ताटे, पाच तांबे, चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचे ताट जप्त करण्यात आले आहेत.

Vaishnavi Hagawane case news
Cab Rules Change : कॅब, टॅक्सीबाबतचा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कॅन्सलेशन चार्जचा नवा नियम काय? जाणून घ्या

पोलिसांनी आरोपी सुशील हगवणे आणि शंशाक हगवणे यांच्याकडे परवाना शस्त्र असल्याने ते दोनही शस्त्र जपण्यात करण्यात आले आहेत त्यातमध्ये एक पिस्तुल आणि वेबले कंपनीचं रिवॉल्वर आहे. आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली एंडेवर गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे.

Vaishnavi Hagawane case news
Maharashtra Monsoon: आनंदाची बातमी! केरळमध्ये धडकलेला मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार? वाचा सविस्तर

फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक काय म्हणाले?

वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी सातव्या दिवशी अटक केली. पोलिसांनी दोघांना शुक्रवार पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेतलं. दोघे ७ दिवस कुठे-कुठे फिरले याचीही माहिती समोर आली. त्यात18 मे रोजी दोघे वडगाव मावळ परिसरातील पवना डॅम परिसरातील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसचा उल्लेख करण्यात आलाय. या फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं काही कृत्य केलं याची मला माहिती नव्हती, असं फाटक यांनी सांगितलं. ते नेहमी येतात म्हणून मी जा म्हटलं, अशी त्यांनी सांगितलंय.

Vaishnavi Hagawane case news
Corona Virus Update : चिंताजनक! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी; धाकधूक वाढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com