Shocking : खळबळजनक! घरात घुसून बायको आणि मुलांसमोरच पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

journalist killed by pakistani militants : घरात घुसून बायको आणि मुलांसमोरच पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बलुचिस्तानमध्ये पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे.
Balochistan News
journalist killed by pakistani militantsSaam tv
Published On

पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये एका वरिष्ठ पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैनिकांशी संबंधित असलेल्या निमलष्करी दलाने घरात घुसून बायको-मुलांसमोरच पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. याआधी कुटुंबातील चार सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

बलूचिस्तानातील अवारन जिल्ह्यात एका पत्रकाराची गोळ्या हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्यातील निमलष्करी दलाने वरिष्ठ पत्रकार अब्दुल लतीफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अब्दुल यांचा जागीच मृत्यू झाला. निमलष्करी दल हे सैन्यात अतिरिक्त कार्य करते. v

Balochistan News
Maharashtra Monsoon: आनंदाची बातमी! केरळमध्ये धडकलेला मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार? वाचा सविस्तर

अब्दुल लतीफ स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करत होते. अब्दुल स्थानिकांच्या समस्या वृत्तपत्रातून मांडायचे. अब्दूल तळागातील लोकांच्या मागण्या वृत्तपत्राच्या माध्यमांतून सरकारपुढे मांडायचे. मात्र, लोकांच्या समस्या मांडणाऱ्या पत्रकार अब्दूल लतीफ यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

Balochistan News
Corona Virus Update : चिंताजनक! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी; धाकधूक वाढली

पाकिस्तानात याआधी देखील अनेक निष्पापांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानात बलूचची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्यांचा आवाज संपवण्याचे कारस्थाने सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुरक्षा दलाकडून अब्दुल लतीफ यांचा मुलगा सैफ आणि त्याच्या कुटुंबातील काहींचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.

Balochistan News
Central Railway : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार; नवी मार्गिका लवकरच सेवेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० जण जखमी झाले होते. स्फोटामुळे अनेक दुकाने कोसळली होती. स्फोट झाल्यानंतर हल्लेखोर आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com