Cable-Stayed Bridge Versova to Madh Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Cable-Stayed Bridge Versova to Madh: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. मुंबईत तयार होतोय केबल स्टे ब्रिज. या ब्रिजमुळे वर्सोवा ते मढ दीड तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांमध्ये होणार आहे.

Priya More

SUMMARY -

  • मढ-वर्सोवा दरम्यान थेट केबल-स्टे ब्रिज उभारण्यात येणार

  • दीड तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांत होणार

  • प्रकल्पाचा खर्च अंदाजे २,३९५ कोटी रुपये येईल

  • फेब्रुवारी २०२६ पासून ब्रिजच्या कामाला सुरूवात होईल

  • ३१ मार्च २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत नवा केबल स्टे ब्रिज तयार होत आहे. मढ-वर्सोवा केबल- स्टे ब्रिजचे काम लवकरच सुरू होणार आहे. या ब्रिजमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि त्यांचा प्रवास सुसाट होईल. मुंबई महानगर पालिकेने फेब्रुवारी २०२६ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याची तयारी केली आहे. या ब्रिजमुळे मढ- वर्सोवा दीड तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांमध्ये होईल.

मढ-वर्सोवा केबल-स्टे ब्रिज प्रोजेक्टसाठी सुमारे २,३९५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या ब्रिजला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर प्रोजेक्टच्या ठिकाणी प्राथमिक सर्वेक्षण आणि माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा ब्रिज मढ जेट्टी रोडपासून सुरू होईल. खाडीच्या वरून तो अंधेरीच्या वर्सोवा परिसरातील फिशरीज युनिव्हर्सिटी रोडजवळ संपेल. सध्या वर्सोवा आणि मढ दरम्यान कोणताही थेट मार्ग नाही. ज्यामुळे प्रवाशांना लोखंडवाला, ओशिवरा, लिंक रोड किंवा मार्वे रोड मार्गे लांबपल्ल्याच आणि वेळखाऊ प्रवास करावा लागतो.

गर्दीच्या वेळेत हा प्रवास एक ते दीड तासांचा होऊन जातो. हा ब्रिज बांधल्यानंतर मढ- वर्सोवा अंतर अंदाजे १८ ते २० किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ फक्त १० मिनिटे होईल. म्हणजेच दीड तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांमध्ये होईल. याचा थेट फायदा हवाई दल क्षेत्र, आयएनएस, मढ, मार्वे, मालाड आणि कांदिवली येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होईल. त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि प्रवास सुसाट होईल.

वर्सोवा-मढ हा हा प्रोजेक्ट २०२९ पर्यंत पूर्ण होईल. २.०६ किमी लांबीच्या या ब्रिजवर ६०० मीटर केबल-स्टेट सेक्शन असेल ज्यामध्ये ३०० मीटरचा मुख्य स्पॅन असेल. दहिसर-भाईंदर कोस्टल रोडला जोडणारा एक अतिरिक्त मार्ग देखील प्रस्तावित आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या मते, वन विभागाकडून अंतिम मंजुरी आणि मुंबई हायकोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर या ब्रिजचे काम वेगाने सुरू होईल. हा प्रोजेक्ट ३१ मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT