Navi Mumbai Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: कर्तव्यावर असताना अनर्थ घडला, हायड्रा वाहनाच्या धडकेत ट्रॅफिक विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू

Navi Mumbai Accident: नवी मुंबईमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ट्रॅफिक विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईच्या महापेमध्ये ते कर्तव्यावर असताना ही घटना घडली.

Priya More

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये ट्राफिक विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. नवी मुंबईच्या महापे परिसरात ही घटना घडली. कर्तव्यावर असताना भरधाव हायड्रा वाहनाने ट्राफिक कर्मचाऱ्याला चिरडलं. या अपघातामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅफिक विभागात कार्यरत असलेले कर्मचारी गणेश पाटील यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. एका हायड्रा वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. टायर अंगावरून गेल्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

ही घटना अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारी असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू असून संबंधित वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सध्या महापे पोलिस अपघाताचा तपास करत आहे. या अपघातामध्ये घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Live Update : निवडणूक चिन्ह कुणाचे? सर्वोच्च न्यायालयात सिब्बल, सरन्यायाधीश अन् जज बागची यांच्यात जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT