heavy traffic jam seen on mumbai ahmedabad national highway today  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Ahmedabad National Highway Traffic Update: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील लेन बंद, वाहनांच्या 3 किलाेमीटर अंतरावर रांगा (पाहा व्हिडिओ)

या वाहतूक कोंडींचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

रुपेश पाटील

Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास माेठ्या प्रमाणात वाहतुक काेंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या तीन किलोमीटर पेक्षा अधिक लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. (Maharashtra News)

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्थानिकांना ये-जा करण्यासाठी पालघर मधील चिंचपाडा येथे पूल तयार करण्यात आला आहे. या पुलाच्या खालील स्लॅबचा काही भाग कोसळून पडला. त्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे.

स्लॅबसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळया ही बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून अवजड वाहनांचा ये-जा करताना मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या महामार्गावरील दोन्ही बाजूच्या मार्गांवरील एक एक लेन बंद करण्यात आली आहे.

यामुळे दोन्ही वाहिन्यांवर वाहतूक धीम्या गतीने सुरू असून मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्य दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरच्यां रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या पूलाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

SCROLL FOR NEXT