Pune News Yandex
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती; गणेश जयंतीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic News: श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Dhanshri Shintre

श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. भाविकांची होणारी गर्दी आणि त्यांची सोय लक्षात घेऊन पुणे वाहतूक विभागाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता पूर्णतः वाहतुकीस बंद केला आहे. यामुळे येथील वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत. मात्र, या निर्णयाचा परिणाम शिवाजीनगर ते स्वारगेटदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होणार असून, त्यांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरीही भाविकांना सुरळीत दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

शनिवारी सकाळपासूनच या परिसरात दर्शनासाठी गर्दी वाढणार असल्याने छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद (Traffic Issue) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस आणि अन्य वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

तसेच, शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस (PMPML Bus) आणि इतर वाहने स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोबीजाबाबा चौक आणि टिळक चौक मार्गे पुढे जावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणारे वाहने झाशीची राणी चौक मार्गे महापालिका भवनकडे जावीत. तसेच, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावर जाणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चौक मार्गे पुढे जावे. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून वाहने पर्यायी मार्गाने वळवली जाणार असल्याचे प्रशासनाने नागरिकांना मार्गदर्शन केले असून, यात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT