Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, नामदेव शास्त्रींची मुंडेंना क्लिन चीट

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठिंब्यानंतर आता साधू-संतही मंत्री धनंजय मुंडेंच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam Tv
Published On

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठिंब्यानंतर आता साधू-संतही मंत्री धनंजय मुंडेंच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. भगवान गडाच्या भेटीनंतर मुंडेंना कुणाकडून क्लिन चीट मिळाली, आणि त्यावर जोरदार टीका का झाली, याबाबतचा हा सविस्तर विशेष अहवाल जाणून घ्या. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, समर्थक आणि विरोधक यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपशील काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऐकलंत... पंकजा मुंडेशी बिनसल्यानंतर २०१६ मध्ये भगवान गडाचा वापर राजकारणासाठी नको, अशी थेट भूमिका घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना मात्र क्लीन चीट दिलीय. सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. त्यांना गोवण्यात येतंय असा थेट दावा करत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय.

Dhananjay Munde
Pune Crime: मध्य प्रदेशातून पुण्यात येऊन करायचा चोऱ्या, पोलिसांनी १५० सीसीटीव्ही तपाले, अशा आवळ्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या

त्यामुळे धनंजय मुंडेंनाही कृतज्ञतेच्या भावना दाटून आल्या. त्यामुळे मनसेच्या प्रकाश महाजनांनी शास्त्रींनी पंकजाला दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिली. अंजली दमानियांनी मात्र नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा जनतेसमोरचा चेहरा दिसत नसल्याचा टोला लगावलाय. तर नामदेव शास्त्रींनी पाठराखण केली असेल तर ते दुरूस्त करतील असा खोचक विश्वास जरांगेंनी व्यक्त केलाय.

Dhananjay Munde
Bhiwandi Crime: भिवंडीत घुसखोर बांगलादेशींविरोधात मोठी कारवाई, ९ महिलांना अटक

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण करत अजित पवारांसह सत्ताधारी आणि विरोधकांना स्पष्ट संदेश दिलाय. त्यामुळे एके काळी भगवान गडावर राजकारण करु नये म्हणणाऱ्या नामदेव शास्त्रींनीच गडाच्या पायंड्याला छेद दिलाय का? संत महंतांनी राजकीय नेत्यांबाबत थेट भूमिका घेणं योग्य आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Dhananjay Munde
Economic Survey 2025: अर्थमंत्री आज सादर करणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल; सुधारणा, विकास आणि आव्हानांवर होणार चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com