Mumbai Pune Expressway, Mumbai Pune Expressway Accident , Traffic Update  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात, चार जखमी; वाहतुक सुरळीत सुरु

आज सकाळच्या सुमारास झाला अपघात.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ बोरघाटात आज (बुधवार) सकाळच्या सुमारास टँकरची आणि टेम्पोचा अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान महामार्गावरील (mumbai pune expressway) वाहतुक (traffic) सुरळीत सुरु आहे. (Breaking Marathi News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली जवळील बोरघाटात मुंबई लेनवर एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकरने पुढे चाललेल्या टेम्पोला धडक दिल्याने हा अपघात झाला. हा टेम्पो पुढच्या कारला धडकला.

या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील जखमींना खोपोलीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात टँकरच्या व कारच्या दर्शनी भागाचे मोठं नुकसान झाले आहे.

दरम्यान अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला आहे. त्यात गॅस नसल्याने मोठा धोका टळला आहे. या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. आता महामार्गावरील वाहतुक सुरळीत सुरू आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT