Pune Traffic yandex
मुंबई/पुणे

Army Day Parade: पुण्यातील वाहतूकीत आज मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic: या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Dhanshri Shintre

येरवडा परिसरातील चंद्रमा चौक ते होळकर पूलदरम्यान शनिवार, ११ जानेवारीपासून वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. हे बदल सैन्य दिन संचलनाच्या तयारीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत लागू राहतील. वाहतूक बदलांची अंमलबजावणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात येईल. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. वाहनचालकांसाठी हा निर्णय तात्पुरता असला तरी तो सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.

येरवड्यातील शादलबाबा चौक ते चंद्रमा चौक मार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. शादलबाबा चौक, डॉ. आंबेडकर चौक, आळंदी चौक, विश्रांतवाडीतील साप्रस पोलीस चौकी आणि जुना होळकर पूल या मार्गांद्वारे वाहनचालकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचता येईल.

तसेच विश्रांतवाडीकडून होळकर पूल मार्गे खडकीकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. या बदलांमुळे प्रवासाच्या वेळापत्रकात अडथळा होऊ नये म्हणून वाहनचालकांनी नियोजन करून प्रवास करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे. विश्रांतवाडी, साप्रस पोलीस चौकी आणि जुना होळकर पूल मार्गे वाहनचालकांनी त्यांच्या इच्छित स्थळी प्रवास करावा. बोपोडी चौक, खडकी बाजार आणि चर्च चौक दरम्यान होळकर पूल मार्गे येरवड्याकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

या मार्गांवरील प्रवासासाठी पाटील इस्टेट आणि वाकडेवाडी मार्गांचा वापर करावा. तसेच, जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील अंडी उबवणी केंद्राजवळील (पोल्ट्री चौक) भुयारी मार्गातून मुळा रस्तामार्गे खडकी बाजाराकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांनी या बदलांनुसार योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

Edited By: अक्षय बडवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT