Thane Traffic Alert Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Traffic Alert : मेट्रो ४ प्रकल्पाच्या कामामुळे ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक ७ जुलैपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध असून पोलीस प्रशासनाने सूचना जारी केली आहे.

Alisha Khedekar

मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु असून कापूरबावडी येथील खांबांवर गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दरम्यान पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक पाच दिवस बंद असण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी काल पासून करण्यात आली आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने कासारवडवली भागात सुरू असलेल्या मेट्रो ४ च्या कामाकरिता डोंगरीपाडा येथे स्टील गर्डर मल्टीएक्सेल वाहनावर चढविण्यात येणार असून त्यासाठी अवजड वाहने मुख्य रस्त्यावरून विरुद्ध दिशेने एक बाजूने सोडण्यात येतील. तसेच ठाणे-घोडबंदरवरून विरुद्ध दिशेने नळपाडा व कापुरबावडी येथे स्टील गर्डरची वाहतूक करण्यात येणार आहे.

या काळात पातलीपाडा व मानपाडा ब्रिजजवळील स्लिप रोड काही वेळ बंद करण्यात येईल. सदर वाहतुक बदल ७ जुलै पर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत असणार आहे. या कामादरम्यान कोणत्याही नागरिकाला इजा होऊ नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने अधिसूचना जारी केली आहे.

पर्यायी मार्ग कोणते ?

घोडबंदर मार्ग वाहतुकीस मार्ग बंद केल्याने त्यांना पर्यायी मार्ग पोलिसांनी खुले केले आहे. स्टील गर्डर वाहतूक करताना, हिरानंदानी इस्टेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पातलीपाडा ब्रिज चढणी जवळ प्रवेश बंद केला आहे. या वाहनांना पातलीपाडा ब्रिजद्वारे जाऊन वाघबीळ ब्रिजखालून जाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

तसेच मानपाडा ब्रिजखालील तसेच टिकुजीनीवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना मानपाडा ब्रिज चढणीजवळ प्रवेश बंद केला आहे. म्हणून पातलीपाडा ब्रिजखालील मार्ग आणि टिकूजीनीवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना मुल्ला बाग मार्गे जाण्याची सोय करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पवार काका-पुतणे एकत्र

टोकाचं पाऊल उचललेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिवाळी सहाय्य|VIDEO

वंदे भारतला नव रुप मिळणार! स्लीपर कोचची वाट पाहणाऱ्यांचा आनंद द्विगणित होणार, ट्रेनचा आलिशान कोच कसा असणार? पाहा...

Friday Horoscope : दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT