Maharashtra Weather Update Saam Tv
मुंबई/पुणे

Today Winter Temprature : राज्यभरात तापमानाचा पारा घसरला, पण नव्या वर्षाची सुरूवात कडाक्याची थंडीने होणार, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात सतत चढ-उतार सुरू असून सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. धुळे, परभणी आणि निफाडमध्ये पारा १० अंशांखाली असून गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू

  • अनेक जिल्ह्यांत पारा १०° सेल्सिअसच्या खाली

  • धुळे व परभणी येथे ७° तापमानाची नोंद

  • मराठवाडा-विदर्भात शेकोट्यांचा आधार

  • बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम

राज्याच्या तापमानात चढ - उतार होत असून गारठा कायम आहे. सकाळी निमुळती थंडी आणि दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी पारा सातत्याने १० अंशांच्या खाली आहे. आज राज्याच्या किमान तापमानात ऊन आणि गारठा पाहायला मिळणार आहे, त्यामुळे थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शुक्रवारी धुळे आणि परभणीत ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर आणि जेऊर येथे ९ अंश, तर पुणे, मालेगाव, ‎‎नाशिक, भंडारा, ‎गोंदिया आणि यवतमाळ येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्यासह, थंडी टिकून राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात सतत बदलत असलेल्या तापमानामुळे नागिरक हैराण झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळ्या आजारांनी मान वर काढली आहे. मराठवाडा, विदर्भात थंडीचा कडाका कायम असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत.

रब्बी हंगामातील पिकांना फटका

थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसु लागला आहे.कळंब तालुक्यात प्रामुख्याने हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनावर परीणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कळंब तालुक्यात हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.खरीप व रब्बी हे दोन्ही प्रमुख पीक हंगाम असुन विविध पिकांची लागवड केली जाते.यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचा पेरणी खर्च ही निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्याची संपुर्ण मदार ही रब्बी हंगामातील हरभरा पिकावर आहे.माञ हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतुन व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे तापमान

‎पुणे : ९.९

अहिल्यानगर : ८.५

धुळे : ७.०

जळगाव : १२.६

जेऊर : ८.५

‎‎कोल्हापूर : १४.५

‎महाबळेश्वर : ११.७

मालेगाव : ९.८

‎‎नाशिक : ९.६

निफाड : ७.९

‎‎सांगली : १२.०

‎सातारा : ११.०

‎सोलापूर : १४.६

‎सांताक्रूझ : १६.९

डहाणू : १६.६

‎रत्नागिरी : १८.१

‎छत्रपती संभाजीनगर : ११.२

‎धाराशिव : १२.०

परभणी : ७.०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या आंदोलनात नेहा बोरा फ्रंटफूटवर, पोलिसांना भिडणारी नेहा बोरा नेमकी कोण?

सोमेश्वरवर 'पवारांचीच' सत्ता; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा 21 जागांवर दणदणीत विजय

दुष्काळग्रस्तांना 'मायक्रो फायनान्स'चा विळखा, कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बायकांचे काढले फोटो

Yuvraj Singh : क्रिकेटच्या मैदानात एकाच वेळी 'दादा'गिरी आणि 'दरारा'; सिक्सर किंग युवराज सिंगवर मोठी जबाबदारी

2029 मध्येही काँग्रेसचा चौथ्यांदा पराभव होणार; अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान

SCROLL FOR NEXT