Ola Uber Strike Impact On Passengers  Saam Tv
मुंबई/पुणे

Ola Uber Strike : ओला-उबरच्या संपाने नागरिक हैराण; मुंबई, पुणे, नागपूरकरांना मोठा फटका!

Ola Uber Strike Impact On Passengers : ओला-उबर चालकांनी भाडे नियमन आणि बाईक टॅक्सीविरोधात देशव्यापी संप पुकारला आहे. याचा मोठा फटका बसत असून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Alisha Khedekar

  • ओला-उबर चालकांचा देशव्यापी संप

  • मुंबई-पुण्यात कॅब सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प

  • ७०–८०% वाहन रस्त्यावर नाहीत

  • सुट्ट्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय

संपूर्ण देशभरात आज ओला, उबर या कंपन्यांनी संप पुकारला आहे. हा संप सरकारला भाडे नियमन करण्यासाठी आणि राईड-हेलिंग क्षेत्रात खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर मर्यादित करण्यासाठी करण्यात आला आहे. दरम्यान लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि ओला, उबर सारख्या कंपन्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संपाचा सर्वाधिक फटका मुंबई, पुणे, नागपूर मधील प्रवाशांना बसत आहे.

राज्यात चालणाऱ्या कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा आणि अ‍ॅप-आधारित कंपन्यांनी लागू केलेल्या मनमानी भाडे वसूलीच्या धोरणांच्या निषेधार्थ ओला, उबर या कंपन्यांनी एकत्र येत आवाज उठवला आहे. यावर सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी या कंपन्यांनी केली आहे. दरम्यान याचा सर्वाधिक त्रास मुंबई पुण्यातील प्रवाशांना होत आहे. अशातच उबेरच्या ड्रायव्हरच्या मोबाईल मधील एक स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये लाल रंग म्हणजे गाड्यांची कमतरता त्या भागामध्ये कंपनीला जाणवत आहे. जवळपास संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चालकांनी बंद पाळला आहे. ७० ते ८० टक्के गाड्या रस्त्यावर नाही, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये सुद्धा फरक जाणवत आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे नागरिक वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी निघाले आहेत. मात्र ओला उबर कंपनीच्या संपामुळे त्यांना गाड्या उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून विविध माध्यमातून सरकारपर्यंत त्यांच्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चालक संघटनांचे म्हणणे आहे, परंतु कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. आता मात्र एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यामध्ये रिक्षा आणि कॅबचालकांनी बंद पुकारल्यामुळे त्यांच्यामध्ये सरकार आणि कंपन्यांबद्दल असणारा रोष किती मोठ्या प्रमाणात आहे हे पाहायला मिळत आहे. दरम्यान सरकार यावर काय तोडगा काढणार? आणि ओला उबर चालकांचा प्रश्न सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT