Sanjay Raut saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: शिंदे गटात 3 एकनाथ शिंदे तयार झालेत; एकाला अमित शाह तर दुसऱ्याला फडणवीसांची ताकद, संजय राऊतांचा टोला

Maharashtra Politics: शिंदे गटात तीन एकनाथ शिंदे तयार झाल्याचा दावा करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार गट आणि भाजपवर निशाणा साधला. गोकुळ दूध संघाची निवडणूक, फडणवीस सरकार आणि दिया मिर्झा प्रकरणावरही त्यांनी टीका केली.

Surabhi Jayashree Jagdish

शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राजकारणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे गटात आता एकनाथ शिंदे यांच्यासारखे तीन नेते तयार झाले आहेत. यातील एकाला अमित शाह, तर दुसऱ्याला देवेंद्र फडणवीस ताकद देत आहेत, असे राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष जसा कोसळणार आहे, तसाच शिंदे गटही कोसळणार असल्याचं राऊत म्हणाले

शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे राजकीय पक्ष नसून केवळ गट आहेत. या गटांना कोणतीही ठरलेली भूमिका नाही. अमित शाह यांनी तात्पुरते तयार केलेले हे गट आहेत. हे नेते एकमेकांसोबत हसत असले, तरी एकमेकांच्या पाठीत वार करण्यासाठीच तयार असल्याचं दिसतं. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष कोसळेल, असं चित्र दिसत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटात तीन एकनाथ शिंदे तयार झालेत

एकनाथ शिंदे यांच्या गटातील अंतर्गत राजकारणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आधी आमच्याकडे एकच एकनाथ शिंदे होते. आता शिंदे गटात तीन एकनाथ शिंदे तयार झाले आहेत. यातील एकाला अमित शाह ताकद देत आहेत, तर दुसऱ्याला देवेंद्र फडणवीस ताकद देत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील राजकारणाची दिशा बदलत आहे. आता हवा बदलत आहे. काही लोकांना पश्चात्ताप होत असेल. दुःख व्यक्त करण्यासाठी माणसाला एखादा खांदा हवा असतो, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

गोकुळच्या निवडणुकीवरून सरकारवर टीका

गोकुळ दूध टीमच्या निवडणुकीवरूनही संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. सरकारमधील लोकच रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत. महाराष्ट्रातील लोकशाही सत्ताधाऱ्यांमुळे संकटात आली आहे, असं राऊत म्हणाले.

गोकुळ दूध संघाच्या २५ जागांपैकी १३ जागांवर सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनेलने विजय मिळवला आहे. त्यामुळे या पॅनेलचा अध्यक्ष होणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील बहुमताचा आदर करत नाहीत. समविचारी पॅनेलचा अध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात एक्स्पर्ट पॅनेल घुसवून गोकुळवर आपला ताबा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

गोकुळ दूध संघ अमूलला विकण्याचा डाव होता. मात्र, शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला. गोकुळ वाचवण्यासाठी फडणवीस यांनी मोर्चा काढावा, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

मुख्यमंत्री रिक्षातून फिरतात, मग मंत्र्यांचं कुटुंबीय कोणत्या गाड्यांत फिरतात?

मुख्यमंत्री रिक्षातून फिरतात, मग मंत्र्यांच्या कुटुंबातील लोक कोणत्या गाड्यांमधून फिरतात, असा सवाल संजय राऊत यांनी केला. तुम्ही मुख्यमंत्री आहात, त्यामुळे तोंडाला येईल ते बोलू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते, तर पाच हजार रुपये दिल्यानंतर त्यांनी मोठा गदारोळ केला असता, असेही राऊत म्हणाले.

दिया मिर्झा प्रकरणात धर्म आणू नका, राऊतांचा भाजपला टोला

दिया मिर्झा प्रकरणावरूनही संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. या प्रकरणात न्यायालयाने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना चपराक मारलीये. या प्रकरणात धर्म आणू नका, असं न्यायालयाने म्हटलंय. मात्र, भाजपच्या काही लोकांनी या प्रकरणात हिंदू-मुस्लिम वाद आणला. महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे. आम्ही आहोत ना हिंदुत्ववादी! शिवसेना हिंदुत्ववादी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार हरपला; माजी जिल्हाप्रमुखाचं अल्पशा आजाराने निधन, शिवसैनिकांमध्ये शोककळा

Pune Metro Ticket: पुणेकरांचा प्रवास सुसाट! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आजपासून सेवेत, तिकीटाचे दर किती?

Vastu Tips: फ्रीज किचनमध्ये ठेवणं शुभ की अशुभ? नेमका कुठे ठेवावा? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Gokul : गोकुळचे महायुतीचे संचालक सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना!

Maharashtra News Live Update : शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन

SCROLL FOR NEXT