"...ही समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी"; मलिकांच्या आरोपांचं नवं ट्विट
"...ही समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी"; मलिकांच्या आरोपांचं नवं ट्विट  Saam Tv
मुंबई/पुणे

"...ही समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी"; मलिकांच्या आरोपांचं नवं ट्विट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपांची फैरी कायम आहे. तर मलिक यांनी आज ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि केपी गोसावी याचे एका व्यक्तीसोबतचे (Informer) व्हॉट्सअॅप चॅट उघड केले आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्या या नव्या खळबळजनक आरोपानंतर या प्रकरणाला आता नवीन ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे.

समुद्रात आयोजित केलेल्या क्रूझ पार्टीवर कारवाई करण्यासंदर्भातील काही चॅट्स आणि ऑडिओ क्लिप Chats And Audio Clips नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवर उघड केले आहेत. यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये केपी गोसावी KP Gosavi हा समीर वानखेडे यांच्या नावाचाही उल्लेख करत आहे असे समोर आले आहे.

...ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी;

मलिक यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे आणि आरोप लावला आहे की, क्रूझवरील पार्टीत ठराविक व्यक्तींनाच टार्गेट करण्यासंदर्भात केपी गोसावी एका व्यक्तीसोबत चॅट्सवर बोलत आहेत. "केपी गोसावी आणि माहिती देणारा व्यक्ती कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचं प्लानिंग करत आहेत. या व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड होत आहे. ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी आहे आणि याची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील", असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

...याचं उत्तर एनसीबीने द्यावे;

क्रुझवर काशिफ खान चिन्हीत असताना त्याला का अटक करण्यात आली नाही शिवाय त्याच्यासोबत असणारा व्हाईट दुबे यालाही वगळण्यात का आले याचं उत्तर एनसीबीच्या समीर दाऊद वानखेडे याने द्यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी आज केली.

दरम्यान काशिफ खान व समीर दाऊद वानखेडे यांचे काय संबंध आहेत याची माहितीही एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी द्यावी असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

या व्हॉटस्ॲप चॅटमध्ये केपी गोसावीला खबरी काशिफ खान व व्हाईट दुबे यांची माहिती देत आहे. तर केपी गोसावी त्याला फोटो पाठवायला सांगत असून त्या खबरीने काशिफ खानचा फोटोही शेअर केला आहे. ज्या पध्दतीने फोटोच्या आधारावर लोकांना चिन्हीत करण्यात आले त्याचपध्दतीने काशिफ खान याला का चिन्हीत करण्यात आले नाही. तो दोन दिवस क्रुझवर असताना त्याला का वगळण्यात आले असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

काशिफ खानवर देशभरात वेगवेगळे गुन्हे आहेत. चारच दिवसापूर्वी मुंबईत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका कोर्टाने तर त्याला फरार घोषित केले आहे इतकं असताना काशिफ खानला का वाचवण्यात येत आहे याचं उत्तर एनसीबीने द्यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

गोव्यात ड्रग्ज टुरीझम चालते;

समीर दाऊद वानखेडे हा झोनल अधिकारी आहे आणि त्याच्या अखत्यारीत गोवा राज्य येते. जगभरातील लोकांना माहीत आहे की गोव्यात ड्रग्ज टुरीझम चालते. रशियन माफिया ड्रग्जचा धंदा करत आहेत. मात्र गोव्यात कारवाई होत नाही कारण काशिफ खानच्या माध्यमातून ड्रग्जचे रॅकेट चालते आणि समीर दाऊद वानखेडे व काशिफ खान यांचे घनिष्ट संबंध आहेत असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

काशिफ खान याला चौकशीला का बोलावण्यात आले नाही?

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात चिन्हीत काशिफ खान याला चौकशीला का बोलावण्यात आले नाही. व्हाईट दुबे हा सुद्धा होता त्याचीही माहिती देण्यात आली होती. मग त्याला का अटक नाही असा जाबही नवाब मलिक यांनी एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना विचारला आहे.

केपी गोसावीचा मोबाइल नंबर दिसत असलेला संवादाचा Screenshot केला शेअर;

तर आत्ता पुन्हा नवाब मलिकांनी केपी गोसावीचा मोबाइल नंबर दिसत असलेला संवादाचा Screenshot शेअर केला आहे. या ट्विट मध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ज्यांना सत्यतेवर शंका आहे त्यांच्यासाठी के पी गोसावी आणि एक माहिती देणारा Informer यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्स पुन्हा पोस्ट केला आहे.

तुमच्या पडताळणीसाठी के पी गोसावी यांचा क्रमांक येथे दिसून येत आहे. तो सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. असं आपल्या ट्विट मध्ये नवाब मलिक यांनी नमूद केलं आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

SCROLL FOR NEXT