Kirit Somaiya: 'हा तर जिवे मारण्याचा कट', किरीट सोमय्या यांचा आरोप...(पहा व्हिडिओ)  Saam Tv
मुंबई/पुणे

Kirit Somaiya: 'हा तर जिवे मारण्याचा कट', किरीट सोमय्या यांचा आरोप...(पहा व्हिडिओ)

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला होता. शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यांना माघारी परतावे लागले होते. यावेळी झटापट झाल्याने सोमय्यांचा तोल गेला आणि पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापत झाली. या गडबडीनंतर किरीट सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी केला आहे. आता त्यांनी नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामधून काही नवे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. (This is a plot to kill Allegation of Kirit Somaiya)

पहा व्हिडिओ-

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला झाला होता. शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यांना माघारी परतावं लागलं. यावेळी झटापट झाल्याने सोमय्यांचा तोल गेला आणि पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापत झाली. या गडबडीनंतर सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. आता त्यांनी नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामधून काही नवे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

हे देखील पहा-

भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवारी पुण्यामध्ये शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले आहेत. यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. संचेती रुग्णालयात जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सत्ताधीर शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. (This is a plot to kill Allegation of Kirit Somaiya)

किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होता. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हल्ला करत आहेत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सत्य कधीच लपणार नाही. अनिल देशमुखांनी सांगितले की अनिल परब बदल्यांची यादी घेऊन यायचे. उद्धव ठाकरे यांचे नाव त्यामध्ये आले आहे, असे देखील पाटील म्हणाले आहेत.

पुणे पोलिसांकडून स्वतःहून स्यु मोटो पद्धतीने या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर आम्ही न्यायालयात जाणार आहे. कारण ही दंगल होती. या सरकारला आम्ही न्यायालयामध्ये गेल्यावर प्रत्येकवेळेस न्यायालयाने लाथाडले आहे. भाजप गप्प बसणार नाही. किरीट सोमय्यांची केंद्र सरकारकडून देण्यात आलेली सी.आय.एस.एफची सुरक्षा व्यवस्था नसती तर त्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती, असे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT