हे सरकार डाकुंचं सरकार! किरीट सोमय्यांचा महाविकास आघाडी सरकारविरोधात पुण्यात एल्गार Saam Tv News
मुंबई/पुणे

हे सरकार डाकुंचं सरकार! किरीट सोमय्यांचा महाविकास आघाडी सरकारविरोधात पुण्यात एल्गार

पुण्यात आलोय, दोन्ही पवारांचे विषय घेणार आणि तिसऱ्या 'अनिल'साठी आज पुण्यात फिरलो असं म्हणत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीसह शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे: भापज खासदार किरीच सोमय्या हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करतायात. आज ते पुण्यात होते. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यात आलोय, दोन्ही पवारांचे विषय घेणार आणि तिसऱ्या 'अनिल'साठी आज पुण्यात फिरलो असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. (This government is a government of bandits! Kirit Somaiya slams Maha Vikas Aghadi government in Pune)

हे देखील पहा -

अनधिकृत बांधकाम करणारे मंत्री मंत्रिमंडळात कसे?

यावेळी त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री यांच्यावर सडकून टीका केली. अनिल परब यांचे विश्वस्त मानले जाणारे परिवहन अधिकारी ''बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची यादी ईडीकडे दिली आहे, बजरंग खरमाटे आणि अनिल परब यांचे संबंधांचे काही कागदपत्रे माझ्या हाती लागले आहेत'' अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टबाबत कारवाई करण्याचे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलं, अनधिकृत बांधकाम करणारे मंत्री मंत्रिमंडळात कसे राहू शकतात, रिसॉर्ट अनधिकृत हे मान्य करता, कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करता, मग परब मंत्रिमंडळात कसे? असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.

भावना गवळींवर गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. ''भावना गवळी यांनी ५५ कोटी कारखान्यातून ढापले, पवार साहेब हे ५५ कोटी दिसत नाहीत? असा सवाल त्यांनी शरद पवारांना केला आहे. तसेच ७ कोटी आले कुठून हे विचारलं की मला जीवे मारण्याची धमकी देता? असा टोलाही त्यांनी लगावला. पुढे ते म्हणाले की, शरद पवार यांना जर भावना गवळी यांना वाचवायचं आहे, तर त्यांनी तसं सांगावं. जरंडेश्वर कारखाना ६५ कोटींना घेतला आणि कर्ज घेतलं ७०० कोटींचं. व्हॅल्यूशन रिपोर्ट कुठं आहे? पवार साहेब, यासाठी सहकार हवा आहे तुम्हाला? शरद पवारांनी कोणाला कितीही प्रमाणपत्रे दिली तरी काही होणार नाही अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे.

१२ व्या खेळाडूचे नाव लवकरच जाहीर करणार

उद्धव ठाकरे यांच्या डर्टी इलेव्हनमधील १२ व्या खेळाडूचे नाव लवकरच जाहीर करणार असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्याना दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावावर १२ बंगल्याचा घोटाळा केला, स्वतः घोटाळा केला असता तर आम्हाला आरोप करताना मर्यादा आल्या नसत्या असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच गणेश विसर्जनानंतर 'विसर्जनाची' प्रक्रिया सुरू करणार हे असा सूचक इशारा त्यांनी दिला. यावेळी हे सरकार डाकुंचं सरकार असल्याची बोचक टीका त्यांना केली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT