उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा

साताऱ्यात उदयनराजे समर्थक सनी भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यात दुचाकी लावण्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर सशस्त्र हाणामारीत झाले.
उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा
उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडाSaam Tv News
Published On

सातारा: साताऱ्यात राजे समर्थकांमध्ये दुचाकी लावण्यावरून झाला वाद आहे. या वादात दोन्हीकडचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले आहेत. शिवेंद्रसिंहराजे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे आणि उदयनराजे समर्थक सनी भोसले यांच्यात दुचाकी लावण्यावरून हा वाद झाला होता. या हाणामारीत सनी भोसले सह 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. (gang war among the supporters of Udayan Raje Bhosale and Shivendra Singh Raje Bhosale)

हे देखील पहा -

सातारा येथे  बुधवारी दोन्ही राजे समर्थकांमध्ये झालेल्या मारामारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक सनी भोसले आणि शिवेंद्रराजे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यात किरकोळ कारणामुळे जोरदार हाणामारी झाली. नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावण्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला. या दोन्ही गटांच्या झालेल्या हाणामारीतून 6 जण गंभीर जखमी झालेत. या मारामारीत शस्त्रांचा वापर करण्यात आला असून या हाणामारीत उदयनराजे समर्थक सनी भोसले सह सहा जण या जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा
'सत्य परेशान हो सकता है पराजित नही' भुजबळांच्या 'क्लीन चीट' वर; अमोल मिटकरींच वक्तव्य

संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर केला. तसेच पिस्तुलचा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर तणावाचे वातावरण आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com